Cyber Crime : सायबर चोरट्यांचा नवा फंडा; पैसे पाठवतो म्हणत पैसेच करतात गायब

‘गुगल पे’ वापरणाऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

पुणे - ‘तुमच्या नातेवाइकांनी मला तुम्हा ‘गुगल पे’वर पैसे पाठवायला सांगितले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या ‘गुगल पे’चा नंबर द्या. मात्र त्यावर पैसे पोहोचत नाहीत. त्यामुळे तुमच्या खात्याची माहिती व ओटीपी सांगा किंवा मोबाइलमध्ये टाइप करा’, असे सांगत सायबर चोरट्यांकडून नागरिकांची बँक खात्यांची माहिती घेऊन त्या आधारे ऑनलाइन पैसे लंपास केले जात आहेत.

विविध शक्कल वापरून सायबर चोरट्यांकडून पुणेकरांना दररोज लाखो रुपयांना गंडा घालण्यात येत आहे. त्याबाबतचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे नातेवाइकांच्या नावाने पैसे पाठविण्याचे आमिष दाखवायचे आणि बँक खात्याची माहिती घेत गंडा घालायचा. अशा प्रकारचे गुन्हे शहरात घडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइलधारकाचे व्हॉटसॲप हॅक करून, ‘मी अडचणीत असून पैशांची आवश्यकता आहे. अमुक एका नंबरवर पैसे पाठवा’, असे मेसेज मित्र, सहकारी, नातेवाईक यांना पाठवून अनेकांना गंडविण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्याच प्रकारे फोन करून देखील आता नागरिकांचा खिसा रिकामा केला जात आहे.

त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची किंवा ऑनलाइन बँकिंगची माहिती देवू नका. तसेच पैशाच्या अनुषंगाने त्यांच्याशी व्यवहार करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

अशी होते बतावणी

  • नातेवाइकाने तुम्हाला पैसे पाठवायला सांगितले आहे

  • पार्सलमध्ये काही तरी आढळले आहे

  • महागडे गिफ्ट विमानतळावर जप्त झाले आहे

  • बँकेतील माहिती अपडेट करायची आहे

  • काळा पैशाच्या व्यवहारात तुमचे नाव आहे

  • ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला पगार मिळेल

  • पॅन क्रमांक अद्ययावत करायचा आहे

  • गुगल रिव्ह्यू लिहिल्यास, युट्युब व्हिडीओला लाइक, कॉमेंट केल्यास पैसे देऊ

  • शेअर ट्रेडिंग

विविध प्रलोभने दाखवून फसवणूक केली जाते. अशा प्रलोभनांना बळी न पडता गैरव्यवहार होणार असल्याची शंका आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. नातेवाइकाचे नाव घेऊन त्यांना तुम्हाला पैसे पाठविण्यास सांगितले आहे, असे भासवून बँकेची माहिती घेत गंडा घातल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फोनची खात्री करून घ्यावी व त्यानंतर त्या व्यक्तीशी बोलायचे की नाही याचा निर्णय घ्यावा.

- सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.