Cyclone Remal : बंगालच्या उपसागरात घोंघावतंय रेमल चक्रीवादळ; पुण्यात हलक्या पावसाची शक्यता!

बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ (Cyclone Remal Update) घोंघावत आहे.
Cyclone Remal Hits Bengal
Cyclone Remal Hits Bengalesakal
Updated on
Summary

पुण्यातील सरासरी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. बुधवारी (ता.२२) हेच कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस होते.

पुणे : बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ (Cyclone Remal Update) घोंघावत असून, त्याचे ऐनवेळेचे परिणाम राज्याच्या हवामानावर दिसण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorology Department) वर्तवली आहे.

कमी दाब प्रणालीची तीव्रता वाढल्याने रेमल चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सागर बेट आणि आणि खेपूपारा दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. याचा थेट राज्यावर परिणाम नसला तरी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासूनच शहर व जिल्ह्यात आकाश बहुतांश ढगाळ होते. दुपारनंतर काही प्रमाणात ते निरभ्र झाले. त्यामुळे कमाल तापमानात अंशतः घट झाल्याचे पाहायला मिळाले.

Cyclone Remal Hits Bengal
'सुरेंद्रकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल यांनी धमकावून चालकाचा फोन काढून घेतला'; कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट!

पुण्यातील सरासरी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. बुधवारी (ता.२२) हेच कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस होते. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बुधवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. त्याची तीव्रता वाढल्याने शनिवारी रेमल वादळी प्रणाली तयार झाली. ही प्रणाली सकाळी बांगलादेशच्या खापूपारापासून ४४० किलोमीटर, पश्चिम बंगालच्या सागर बेटांपासून ४४० किलोमीटर दक्षिणेकडे होती.

Cyclone Remal Hits Bengal
Indian Navy : नौदलातील वरिष्ठ अधिकारी व्हाईस ॲडमिरल गुरचरणसिंग 'NDA'चे नवे कमांडंट

रविवारी (ता. २६) ही वादळी प्रणाली बांग्लादेश, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पोचणार आहे. मध्य रात्री ताशी ११० ते १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह ही प्रणाली सागर बेट आणि खेपूपारा दरम्यान जमिनीवर येण्याचा इशारा आहे. या वेळी पश्चिम बंगाल, ओडिशा, बांग्लादेशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान समुद्र खवळणार असून ३ ते ४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या किनाऱ्यालगत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Remal Hits Bengal
Pune Accident Case : पुण्यात सात दिवसांत 20 अपघात; दहा जणांचा बळी, तर दहा जण जखमी

मॉन्सून वेळेवर दाखल होणार

वादळी प्रणालीमुळे चाल मिळाल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वाटचाल सुरू ठेवली आहे. शनिवारी बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. पुढील वाटचालीस प्रगतीस पोषक हवामान असल्याने रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.