पुणे - गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाहेर उपोषण सुरू करण्यात आलं असून आज ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी उपोषणकर्ते दादासाहेब गायकवाड यांची भेट घेतली आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन केलं. यावेळी दादासाहेब गायकवाड यांनी आमच्या मागण्यांच्या काय असा सवाल केला असता उपोषण मागे घ्या, यल्लपा जाधव यांच्यावर कारवाई च पत्र शासनाला पाठवू, अस यावेळी त्यांनी सांगितल.