पुणे - पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागे महापालिकेच्या जलवाहिनीवर मातीचा भराव टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्या दबावामुळे जलवाहिनीतून रोज सुमारे ४० लाख लिटर पाण्याची गळती होत आहे. या अतिक्रमणामुळे जलवाहिनी फुटल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आज महापालिकेने कारवाईचा प्रयत्न केला. पण विरोधामुळे ही कारवाई करता आली नाही.