पुणे - बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात डेअरीला आग लागून मालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १७) मध्यरात्री घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रामदास साळुंके (वय ६५, रा. येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या डेअरी मालकाचे नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुखसागरनगर भागात साळुंके यांची किसान डेअरी आहे. याठिकाणी मध्यरात्री दूध वाहतूक करणारी वाहने येतात. त्यामुळे साळुंके दररोज डेअरीतच झोपत असत.