मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी

aslam shekh
aslam shekh
Updated on

पौड (पुणे) : निसर्ग चक्रीवादळ आणि पावसामुळे मुळशी तालुक्यातील सुमारे 2200 छोट्यामोठ्या घरांचे आतोनात नुकसान झाले आहे. 500 पेक्षा जास्त वीजेचे खांब कोलमडले आहेत. अनेक शेतकऱ्यांची खाचरे पाण्याने तुडूंब भरल्याने भाताच्या दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले आहे. या नुकसानीची वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख व आमदार संग्राम थोपटे यांनी स्वतंत्रपणे पाहणी केली.  

चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची  मंत्री अस्लम शेख यांनी पहाणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी ग्रामस्थांना अन्नधान्याचे वाटप केले.  या वेळी तहसिलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय उपायुक्त  देशपांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, अविनाश बलकवडे, हनुमंत सुर्वे, सरपंच श्रीराम वायकर आदी उपस्थित होते.

या वेळी शेख म्हणाले की, नुकसानग्रस्त घरांवर लवकरात लवकर पत्रे व छप्पर बसवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत केरोसिनचा पुरवठा करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. लोकांना जेवणाच्या साहित्याचा देखील पुरवठा करण्यात आला आहे. वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी येथील प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.

दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांनीही शासकीय अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या वेळी तहसीलदार अभय चव्हाण, महावितरण अभियंता के. के. फड, गटविकास अधिकारी संदीप जठार, नायब तहसीलदार भगवान पाटील, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ , तालुका काॅंग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नीलेश दगडे, राष्ट्रवादीचे नेते अंकुश वाशिवले, मधुर दाभाडे , विजय मिरकुटे , नीलेश सुर्वे  उपस्थित होते.  

आमदार थोपटे म्हणाले की, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या घरशेताचे पंचनामे करून घेण्यासंदर्भात तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.  नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये अफवांवर विश्वास ठेऊ नये.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.