Pune Rain Update : पुणेकरांनो, सतर्क राहा ;आयुक्त भोसले

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली असून, सध्या या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
Pune Rain Update
Pune Rain Updatesakal
Updated on

पुणे/सिंहगड रस्ता : खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली असून, सध्या या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच येत्या तीन ते चार तासांत जिल्ह्यातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे कोणत्याही क्षणी खडकवासला प्रकल्पातून सध्याच्या तुलनेत अधिक पाणी सोडण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत धरणांतून सोडलेले पाणी शिरण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

पुण्यातील ज्या भागांत पाणी शिरण्याचा धोका आहे, अशा भागांत महापालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी पथक नियुक्त केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता मदतीची गरज भासल्यास पालिकेच्या ०२५५०१२६९ किंवा २५५०६८०० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही भोसले यांनी आवाहनात म्हटले आहे.

सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीतील द्वारका सोसायटीमध्ये रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने एकता नगरीतील सर्व सोसायट्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविलेला आहे. नागरिकांनी त्यांच्या पार्किंगमधील दुचाकी आणि चारचाकी वाहने काढून घ्यावीत, तसेच घरातील अत्यावश्यक व महत्त्वाचे साहित्य घेऊन पूरग्रस्त निवारा केंद्रामध्ये जावे असे आवाहन केले आहे.

निवारा केंद्र...

सनसिटी भाजी मंडई शेजारील बचत गट केंद्र, अनुश्री मंगल कार्यालय माणिकबाग आणि कै. रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव सभागृह सनसिटी रस्ता येथे निवारा केंद्र आहेत. याबरोबरच सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत महापालिकेच्या चार शाळांमध्येदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.