Pune : पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास...

पुलाची उंची वाढविण्याची मागणी...
Pune
Pune sakal
Updated on

वालचंदनगर : निरवांगी (ता.इंदापूर) जवळील निरवांगी-खोरोची रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाचे पाणी व नीरा नदीच्या फुगवट्याचे पाणी पुलावरुन वाहते. जीव धोक्यात घालून नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत असून पुलाची उंची वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

इंदापूर तालुक्यातील च्या पश्‍चिम भागामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची,नागरिकांनी दाणादाण उडाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले.पावसामुळे ओढे-नाले तुंडूब भरुन वाहत होते. निरवांगी-खोरोची रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने सोमवपारच्या पावसाचे पुलावरुन पाणी वाहू लागले.

सकाळी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाच्या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून शाळेत यावे लागले. तसेच दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांनाही पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला. पुलाची उंची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना जीव धोकयात घालावा लागत असून पुलाची उंची वाढविण्याची मागणी निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ,दत्तात्रेय पोळ,बाळासाहेब गायकवाड,खोरोचीचे दादासाहेब भाळे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.

निरवांगी (ता.इंदापूर) पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे निरवांगी-खोरोची रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेला असून विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना धोकादायक पद्धतीने पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()