Darshana Pawar Murder: "दगडाने हल्ला करून.." राहुलने दिली दर्शनाच्या खुनाची कबुली, असा होता संपूर्ण घटनाक्रम

दर्शनाचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्याने मित्रानेच केला घात
pune crime
pune crimeesakal
Updated on

पुणे: अहमदनगर जिल्ह्यातील तरुणी दर्शना पवार हिच्या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून बुधवारी रात्री अटक केली.

दर्शनाचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्याने तिचा तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने वार करून खून केल्याची कबुली राहुल याने दिल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली दिली.

राहुल दत्तात्रेय हंडोरे (वय २८, रा. हिंगणे होम कॉलनी, मूळ रा. शहा, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

pune crime
Eknath Shinde Gat : मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कुणाची वर्णी लागणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना दत्तू पवार (वय २६, रा. न-हे, मूळ कोपरगाव, जि. अहमदनगर) हिचा मृतदेह किल्ले राजगडच्या पायथ्याशी १८ जून रोजी आढळून आला होता.

दर्शना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाली होती. तिचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोबाईल, बूट ,गॉगल, पर्स, ओढणी या वस्तूंवरून दर्शनाच्या मृतदेहाची ओळख पटली.

शवविच्छेदन अहवालात डोक्यावर आणि अंगावरील मारहाणीच्या जखमांमुळे दर्शनाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पुणे ग्रामीणच्या वेल्हे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाच पथकांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता.

दर्शना ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील असून, राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र असून, लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होते. दोघे लग्न करणार होते.

pune crime
Eknath Shinde: 'मुख्यमंत्री शिंदे हे शिवसैनिक नसून भाजप सैनिक' ठाकरे गटाच्या नेत्याचं खरमरीत ट्विट

राहुल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह फूड डिलिव्हरी सर्विसमध्ये काम करीत होता. राहुल याने परीक्षेपूर्वी तिच्याशी ब्रेकअप केले होते. दर्शनाची लोकसेवा आयोगामार्फत वन अधिकारी (आरएफओ) पदावर निवड झाली.

त्यानंतर राहुल पुन्हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी जमवल्याने राहुल अस्वस्थ होता. त्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे त्याने सांगितले. परंतु दर्शनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, दर्शना ही ९ जून रोजी पुण्यात एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. त्यानंतर ती सोमवारी (ता. १२) राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती.

परंतु दर्शनाचा फोन लागत नसल्यामुळे दर्शनाचे वडील आणि नातेवाइकांनी किल्ले राजगडच्या परिसरात शोध घेतला. परंतु तिचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे वडिलांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दर्शना आणि राहुल दोघे सकाळी सव्वासहा वाजता किल्ले राजगडावर जाताना एकत्रित दिसत होते.

परंतु परत येताना पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास तो एकटाच दिसून आला होता. त्यामुळे राहुल याच्यावर संशय बळावला होता. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि हत्यारे अद्याप जप्त केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

pune crime
Eknath Shinde : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी CM शिंदे आले धावून; मविआच्या सभेला जात असताना...

या पत्रकार परिषदेस पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश गट्टे, हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक राहुल गावडे.

प्रदीप चौधरी, रामदास बाबर, हेमंत विरोळे, राजू मोमीन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत, दगडू विरकर, तसेच वेल्हे पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक मनोज पवार.

पोलिस हवालदार योगेश जाधव, ज्ञानदीप धिवार, औदुंबर अडवाल, राहुल काळे, अजय शिंदे, आकाश पाटील, गणेश चंदनशिव, ज्ञानेश्वर शेडगे, विजय घोयने आदी कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणची पाच पथके राहुल याच्या मागावर होती. राहुल याचे शेवटचे लोकेशन कात्रज येथे आढळून आले होते. या घटनेनंतर इतर राज्यांमध्ये फिरत होता. नवी दिल्लीतील एका एटीएम सेंटरमधून त्याने कार्डवरून पैसे काढले होते. त्याने नातेवाइकाशी फोनवर संवाद साधल्याचे तपासात समोर आले आहे.

घटनाक्रम-

९ जून - खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कारासाठी दर्शना पवार पुण्यात दाखल

१० जून - ओळखीच्या तरुणासमवेत किल्ले राजगड फिरण्यासाठी गेल्याची माहिती

१० जून - सायंकाळी चार वाजेपर्यंत दर्शना घरातील व्यक्तींच्या संपर्कात

११ जून ते १४ जून - वडील आणि नातेवाइकांकडून दर्शनाचा शोध

१५ जून - सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार

१८ जून- किल्ले राजगडच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह आढळला

२१ जून- संशयित आरोपी राहुल हंडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.