आंबेगाव : आंबेगावचा दत्तनगर चौक आणि वाहतूक कोंडी हे समीकरण नित्याचे झाले आहे.बेशिस्त वाहने चालविणे ,अरुंद अतिक्रमण झालेले रस्ते आणि अवजड वाहनांमुळे चौकातील कोंडीत भर पडते आहे.
याचा फटका विद्यार्थी, चाकरमान्यांना तसेच व्यावसायिकांनाही बसत असल्याचे चित्र दिसते आहे. त्यात गेल्या आठवड्यात चौकातील ड्रेनज लाइनचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.त्याचा राडारोडा आणि खडी तशीच रस्त्यावर पडून असल्याने दुचाकी वाहने हाकण्यास अडथळा येतो आहे.
दत्तनगर,आंबेगाव खुर्द,शनीनगर,हनुमाननगर,लिपाणे वस्ती आदी परिसरात कष्टकरी वर्ग मोठ्याप्रमाणत वास्तव्यास आहे.दत्तनगर चौकातील वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी एक ते दोन तास लागत असल्याचे स्थानिक सांगत आहेत.
तर वाहतूकोंडीमुळे बऱ्याचवेळा रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत.शिवाय स्कूलबस ही कोंडीत सापडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास विलंब होत असल्याचे पालक सांगतात.मध्यंतरी भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस आणि धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय पथ विभागाच्या समन्वयातून दत्तनगर चौक,भारती विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संयुक्तिक प्रयत्न करण्यात आला होता.मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
दत्तनगर ते शनीनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले आहेत.परंतु या दुभाजकांवर पंधरा ते वीस फुट अंतरावर वाटा काढण्यात आल्या आहेत.
वाहनचालक वाहतूककोंडी दिसताच दुभाजकातील वाटांमधून गाड्या विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे हाकत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते आहे. रस्त्यावर अवजड वाहनास दुपारी एक ते चार ही वेळ दिलेली असताना नियम धाब्यावर बसवून अवजड वाहतूक होत असल्याने वाहतूककोंडी होताना दिसते.
दआंबेगाव,जांभूळवाडी-कोळेवाडी,आंबेगाव खुर्द या दक्षिण पुण्याच्या पट्ट्याला जोडणारा रस्ता हा दत्तनगर चौकातून जात असल्याने येथे वाहतूकोंडी नित्याची होते आहे.चौकातून दुपारी एक ते चार यावेळेत अवजड वाहनांना प्रवेश दिला असला तरी सर्रासपणे चौकातून अवजड वाहने जाताना दिसत आहेत.
'परिसरातील डीपीरस्ते अद्याप विकसित झाले नसल्याने चौकात वाहतूककोंडी होते आहे. आंबेगाव परिसरात मोठया प्रमाणावर नागरीकरण झाले आहे याचा परिणाम म्हणजे रोज होत असलेली वाहतूककोंडी.डीपी रस्ते विकसित होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- संतोष ताठे, माजी सरपंच आंबेगाव
'आंबेगाव पठारकडे चिंतामणी ज्ञानपीठ कडून जाणारा रस्ता जलवाहिनीचे काम चालू असल्याने बंद करण्यात आला होता.पठाराकडे जाणारी वाहतूक ही दत्तनगर चौक मार्गे वळविण्यात आली होती.त्यामुळे चौकात वाहतूककोंडी झाली होती.शिवाय दत्तनगर चौकातील असणारा राडारोडा उचलण्या संदर्भात आणि रस्ता करणे संदर्भात बोलणे सुरू आहे.
- प्रशांत कणसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.