Kedgaon News : दौंडच्या वैमानिक मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरात कौतुक

३६ हजार फुट उंचीवर विमान उडत असताना प्रवाशांना जेव्हा विमानात बिघाड झाल्याचे कळाले तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
maitreyi shitole
maitreyi shitolesakal
Updated on

केडगाव - ३६ हजार फुट उंचीवर विमान उडत असताना प्रवाशांना जेव्हा विमानात बिघाड झाल्याचे कळाले तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. बोईंग विमानाने तिरूचिरापल्ली विमानतळावरून शारजासाठी उड्डाण केले मात्र हायड्रोलिक सिस्टिममधील बिघाडामुळे विमानाला तात्काळ लँडिंग करावे लागले.

विमान लँड होताना अपघात घडू शकतो ही शक्यता गृहीत धरून विमानतळावर २० रूग्णवाहिका, पाच अग्निशमन पथके तैनात ठेवण्यात आली होती. सर्वांच्या नजरा लँडिंगकडे लागल्या होत्या. अखेर सुदैवाने सुखरूप लँडिंग झाले अन् सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या विमानात को पायलट होती दौंड तालुक्यातील मैत्रेयी शितोळे.

कुसेगाव येथील मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे ही एअर इंडियामध्ये पायलट आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी तीच्या विमानाने शारजा (युएई) साठी उड्डाण केले. विमानात १४० प्रवासी, दोन पायलट, क्रु मेंबर होते. मात्र थोड्याच वेळात वैमानिकांच्या असे लक्षात आले की, विमानाची हायड्रोलिक सिस्टीम काम देत नाही. विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावे लागणार होते.

विमानात इंधन भरपूर होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे इंधन कमी करावे लागत होते. त्यामुळे विमान आकाशात अडीच तास घिरट्या घालत होते. घिरट्या घालत असताना अनेकांना असे वाटत होते की, हे विमान नियंत्रणाच्या बाहेर गेले आहे की काय. प्रवाशांसह सर्वांचा जीव टांगणीला लागला होता.

इमर्जन्सी लँडिंगमध्ये दुर्घटनेची शक्यता गृहीत धरून विमानतळ प्राधिकरणाने सर्व खबरदारी घेतली होती. विमानतळावर २० रूग्णवाहिका, डॅाक्टर, पाच अग्निशमन पथके, पोलिस सर्वांना पाचारण केले होते. सुदैवाने रात्री सव्वा आठ वाजता विमानाचे सुखरूप लँडिंग झाले. प्रवाशांच्या जीव भांड्यात पडला. अन् विमानतळावरील कर्मचारी, प्रवाशांचे नातेवाईक, प्रवाशी यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान काही प्रवाशांच्या नातेवाईकांनी पुजा-पाठ करत देवाला साकडे घातले होते.

विमानातील मुख्य पायलट व को पायलट मैत्रेयी शितोळे यांनी आपले कसब पणाला लावला. १४० प्रवाशांचा जीव वाचवला. मैत्रेयी एअर इंडियातील कामाचा एक वर्षांचा अनुभव आहे. तो तीने कठीण प्रसंगात अजिबात विचलित न, प्रसंगावधान राखत अनुभव कामी आणला. या कौशल्यासाठी मुख्य वैमानिक क्रोम रिफादली फहमी व मैत्रेयीचे पायलटचे जगभर कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.