दौंड : महिला पोलीस कर्मचा-याची देलवडीत आत्महत्या

पोलीस नाईक कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
महिला पोलीस कर्मचा-याची देलवडीत आत्महत्या.
महिला पोलीस कर्मचा-याची देलवडीत आत्महत्या.sakal
Updated on

राहू : पोलीस नाईक कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून देलवडी (ता.दौंड) येथे एका महिला पोलीस शिपायाने बुधवार (ता. ३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपाली बापुराव कदम (वय 26 वर्ष) मुळगाव देलवडी (ता.दौंड) सध्या लोकरी माणिकपूर वसई मुंबई ) येथे पोलीस नाईक पदावर सेवेत असणाऱ्या मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी होऊन संबंधितावर कडक कारवाई होणार का..? असा प्रश्न दीपालीच्या संतप्त नातेवाईकांनी केला आहे. गळफास घेण्यापूर्वी तिने आपला भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाल्मीक गजानन अहिरे (रा. पालघर मुंबई) यांच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दोन वर्षापूर्वी मयत दिपाली कदम यांची पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या वाल्मीक अहिरे यांच्याशी ओळख झाली.आरोपी अहिरे हा वारंवार दीपालीस शारीरिक व मानसिक त्रास देत होता. ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी दिपालीचा साखरपुडा झाला होता.

महिला पोलीस कर्मचा-याची देलवडीत आत्महत्या.
अकोला : दिवाळीमुळे चार दिवस कोरोना लसीकरण बंद !

येत्या 16 नोव्हेंबर रोजी दीपाली व मयूर कांबळे यांचा शुभविवाह ठरला होता. साखरपुडा व लग्नामुळे दिपाली सध्या तिच्या मूळ गाव देलवडी (ता. दौंड)येथे होती. सदर लग्न जमल्याची माहिती आरोपी अहिरे यांना समजताच त्यांनी नवरदेव मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे(राहणार भोसरी पुणे) यांना फोन करून दिपाली संदर्भात माहिती दिली. त्यानंतर सदर बाब मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे यांनी दिपालीचे वडील बापुराव कदम यांच्या कानावर घातली.

वाल्मीक आहिरे याने ता.२ रोजी रात्रीच्या सुमारास दिपालीचा भाऊ रोहित फोन करून तुम्ही तिचे इतर कोणाशी लग्न करू नका नाहीतर तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी दिली. मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीयांनी दिपाली हिस समजावून सांगितले. बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन दीपालीने आत्महत्या केली. यासंदर्भात दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहे. आज चार वाजन्याच्या सुमारास दीपालीवरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.