पुण्यात तयार होणार Sputnik-V; सीरमला DCGIची परवानगी

डीसीजीआयच्या परवानगी नंतर आता सीरम कोविशील्डसह स्पुतनिक-व्हीचंही उत्पादन घेणार आहे. स्पुतनिक व्ही लसीची निर्मिती करणारी सीरम ही सहावी कंपनी ठरली आहे.
sputnik v
sputnik vfile photo
Updated on
Summary

डीसीजीआयच्या परवानगी नंतर आता सीरम कोविशील्डसह स्पुतनिक-व्हीचंही उत्पादन घेणार आहे. स्पुतनिक व्ही लसीची निर्मिती करणारी सीरम ही सहावी कंपनी ठरली आहे.

पुणे : कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण मोहिम राबविली जात आहे, पण देशाची लोकसंख्या आणि निर्यातीबाबतच्या निर्धारित करारांमुळे लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर कोरोना लस तयार करणाऱ्या परदेशी कंपन्यांशी संपर्क करत आहेत. या दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. देशातील अग्रगण्य लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या निर्मितीला प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. (DCGI grants Serum Institute of India the permission to manufacture SPUTNIK V)

sputnik v
राज्यात नवे रुग्ण 15 हजाराच्या आत; मृतांची संख्याही घटली

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या हडपसर येथील प्रकल्पात स्पुतनिक-व्ही चे उत्पादन घेण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI)ने परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी लसीच्या परीक्षण, विश्लेषण आणि निर्मितीबाबत डीसीजीआयला निवेदन दिलं होतं. डीसीजीआयच्या परवानगी नंतर आता सीरम कोविशील्डसह स्पुतनिक-व्हीचंही उत्पादन घेणार आहे. स्पुतनिक व्ही लसीची निर्मिती करणारी सीरम ही सहावी कंपनी ठरली आहे. स्पुतनिकच्या उत्पादनाला अजून काही महिने लागू शकतात, कोविशील्डचं उत्पादन नेहमीप्रमाणे होत राहील, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवक्त्यांनी दिली.

sputnik v
पुण्यात संततधार; मॉन्सून रविवारी राज्यात दाखल होण्याची शक्यता

भारतात कोविशील्ड व्यतिरिक्त भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजद्वारे स्पुतनिक-व्ही या लसींचं उत्पादन घेण्यात येत आहे. स्पुतनिकला जगभरातील ६५ हून अधिक देशांमध्ये मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाविरुद्ध स्पुतनिक ९१.६ टक्के परिणामकारक सिद्ध झाली आहे. भारतात स्पुतनिक-व्हीचा एक डोस ९४८ रुपयाला उपलब्ध असून त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे स्पुतनिक-व्हीच्या एका डोससाठी ९९५ रुपये मोजावे लागणार आहेत.

(Edited by : Ashish N. Kadam)

sputnik v
पुणे : गुन्हेगार दवाखान्यातून फरार; पोलिसांना हलगर्जीपणा नडला

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.