Pune Nashik Expressway : सर्वेक्षण जागेवर थांबविले जाईल! पुणे-नाशिक हायवेबद्दल अजित पवारांचं महत्वाचं विधान

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग खेड, शिरूर,आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या बागायती भागातून जात आहे.
Ajit pawar
Ajit pawarsakal
Updated on

मंचर : “पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचे सर्वेक्षण सुरु आहे. पण या रस्त्यासाठी बागायती जमिनी मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेतल्या जातील. सदर रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण जागेवर थांबविले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून रस्त्यासाठी पर्यायी जागा निवडण्याचे काम केले जाईल.” असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई येथे मंत्रालयात बुधवारी (ता.१२) राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील, दूरदृश्य माध्यमातून आमदार अतुल बेनके, नीयोजन मंडळाचे अप्पर सचिव राज गोपाळ देव देवरा, अर्थ खात्याचे सचिव ओ.पी गुप्ता, सार्वजनिकबांधकाम विभागाचे सचिव संजय देशपुते ,,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल कुमार गायकवाड उपस्थित होते.

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या बागायती भागातून जात आहे. या रस्त्याला शेतकर्यांनी विरोध आहे. याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतअजित पवार यांनी बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती केली होती.

Ajit pawar
Pune Accident : पुण्यात पुन्हा अपघात! गंगाधाम रस्त्यावर डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पवार म्हणाले “सर्व अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. सदर रस्त्यांसंदर्भात जी काही प्रक्रिया सुरू केली आहे. ती आहे त्या जागी थांबवा. मी व वळसे पाटील लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ. सदर रस्त्याबाबत लोकांच्या असणाऱ्या तीव्र भावना व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा असणारा विरोध त्यांच्या कानांवर घालू. सदरचा प्रस्ताव रद्द करून दुसरा पर्यायी मार्गाने हा रस्ता करण्याची मागणी करण्यात येईल.”

जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज, अशोक आदक पाटील, गुरुदेव पोखरकर, ऋषिकेश गावडे, नाथा वाळुंज, अशोक वाळुंज, प्रकाश दौंड, वैभव उंडे, अर्जुन थोरात आदी शेतकरी प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला.

Ajit pawar
Rahul Gandhi News : पंतप्रधान मोदींचे जम्मूतील हल्ल्यांकडे दुर्लक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.