Accident Death : येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात चारचाकीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारचालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Accident Death
Accident Deathesakal
Updated on

विश्रांतवाडी : येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात चारचाकीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेत केदार मोहन चव्हाण (वय ४१) हा दुचाकीस्वार मृत्युमुखी पडला. कारचालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात देण्यात आले असून याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Accident Death
Nashik Crime News : पंचवटीत 6 महिन्यांत 8 खून!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीने जात होते. यावेळी चक्कर आल्याने केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून येणारी चारचाकी गाडी त्यांच्या अंगावर गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. केदार चव्हाण हे ईव्ही कुरिअर सर्व्हिसेस येथे कामाला होते. चव्हाण हे स्वारगेट येथून बुकिंग पार्सल घेऊन विमानतळ येथे जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.