Pune Crime : मृत्यू झालेल्या तरुणास साथीदारांनी ठेवले डोंगरात पुरून ; टॉवरच्या तारांची चोरी करताना पडून झाला मृत्यू

महावितरणच्या टॉवरच्या तारांची चोरी करण्यास गेलेल्या तिघांपैकी एकाचा टॉवर वरुन पडून मृत्यू झालेल्या साथीदाराचा मृतदेह इतर दोन साथीदारांनी डोंगरात पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राजगड (वेल्हे ) तालुक्यात गुरुवार (ता.०८) रोजी रात्री दीड च्या सुमारास समोर आला असून दुर्गम पाबे घाटात पोलिसांसह रेस्क्यू टीम दाखल झाली असल्याची माहिती वेल्ह्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब पडळकर यानी दिली.
Pune Crime
Pune Crime sakal
Updated on

वेल्हे : महावितरणच्या टॉवरच्या तारांची चोरी करण्यास गेलेल्या तिघांपैकी एकाचा टॉवर वरुन पडून मृत्यू झालेल्या साथीदाराचा मृतदेह इतर दोन साथीदारांनी डोंगरात पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राजगड (वेल्हे ) तालुक्यात गुरुवार (ता.०८) रोजी रात्री दीड च्या सुमारास समोर आला असून दुर्गम पाबे घाटात पोलिसांसह रेस्क्यू टीम दाखल झाली असल्याची माहिती वेल्ह्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब पडळकर यानी दिली.

याप्रकरणी बसवराज पुरंत मॅगिनमनी (वय.२२) सध्या रा. वडगाव बु.पुणे मुळ गाव मुक्काम पोस्ट तोळजुर,ता.अक्कलकोट, जि.सोलापूर असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून हा तरुण बेपत्ता असल्याची फिर्याद सिंहगड रोड पोलीस ठाण्यात २३ जुलै दाखल करण्यात आली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

बसवराज मॅगिनमनी हा इसम रुपेश अरुण येनपुरे, सौरभ बापू रेणुसे( वय.२५) दोघेही राहणार पाबे यांचेसोबत दिनांक १३ जुलै रोजी रांजणे, ता.राजगड (वेल्हा ) या ठिकाणी असलेल्या एमएसईबी टॉवरची तांब्याची वायरची चोरी करणेसाठी गेले असताना, सदर ठिकाणी बसवराज मॅगिनमनी हा टॉवरवर चढुन एक्साब्लेडने वायर कापत असताना, वायर कापुन तो टॉवरवरुन खाली पडुन, जखमी होवुन मयत झाल्याने त्यास रुपेश अरुण येनपुरे, सौरभ बापू रेणुसे यांनी पाबे घाट, ता. वेल्हा, जि. पुणे येथील येथे डोंगरात खड्डा काढून गाडले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिस व रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.