Indapur Gun Firing : इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू

इंदापूर शहरातील महाविद्यालयासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल चव्हाण या तरुणाचा पुणे येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
Rahul Chavan
Rahul Chavansakal
Updated on

इंदापूर - इंदापूर शहरातील महाविद्यालयासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल चव्हाण या तरुणाचा पुणे येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यावर शनिवार (ता. 05) रोजी इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (ता. 30) रोजी सायंकाळी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या राहुल अशोक चव्हाण (वय-30 वर्षे, रा. शिरसोडी) यांचेवर इंदापूर महाविद्यालयासमोर चार राऊंड फायर करीत गोळीबार करण्यात आला होता.

यामध्ये राहुल यांच्या पाठीवर गोळ्या लागल्या होत्या. त्याच्यावर प्रथम इंदापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यानंतर अकलूज व नंतर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणातील गोळीबार करणाऱ्या धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले यास इंदापूर पोलिसांनी दोन तासात अटक केले होते.

तसेच यामधील अभिजित बाळकृष्ण चोरमले, क्षितिज बाळकृष्ण चोरमले, प्रकाश हंबीरराव शिंदे असे एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अशोक केरबा चोरमले, विश्वजित हनुमंत चोरमले, महेश रमेश शिंदे, ओम सोमनाथ ठवरे, सोमनाथ ठवरे (सर्व रा. शिरसोडी, ता. इंदापूर) हे फरार आहेत.

दरम्यान पुणे येथे उपचार सुरू असताना राहुल याचा शुक्रवार (ता. 04) रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्याचेवर शनिवार (ता. 05) रोजी शिरसोडी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संवेदनशील विषय असल्याने पोलिसांनी पुण्यापासून शिरसोडी मार्गावर तसेच गावातही चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.