एसटीच्या धडकेत
तरुणीचा मृत्यू

एसटीच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Published on

कात्रज, ता. १५ : दोन दिवसांपूर्वीच कात्रज चौकात दोन पीएमपी बसमध्ये सापडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच शनिवारी (ता. १५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास याच चौकात एसटी बसचा दुचाकीला धक्का लागून एका तरुणीचा मृत्यू झाला. श्वेता चंद्रकांत लीमकर (वय २५, मुळ रा. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ती खेड शिवापूर येथील एका कंपनीत ती नोकरीला होती. अपघाताची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलिस ठाणे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.