चाकण - निघोजे (ता. खेड) येथे पत्नीच्या अंगावर चिठ्ठी फेकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून निघोजे येथील संकेत रामचंद्र गावडे (वय २५, मूळ रा. सातारा) या विवाहित तरुणाला त्याच्या पत्नी समोर व मुलासमोर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण झाली होती. उपचार सुरू असताना त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केली असून, त्यातील पाच जणांना अटक केली आहे.