येरवडा- पुणे शहरातील ससून रुग्णालयातील ‘मयत पास’ तब्बल २८ वर्षांनंतर ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा शारिरीक व मानसिक त्रास कमी झाला आहे.अंत्यसंस्कार ही प्रक्रिया अधिक सुरळीत सुरू रहावी, नातेवाईक व मित्रपरिवार यांना वेळेत सर्व विधी पूर्ण करता यावे यासाठी सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, 'स्व'-रूपवर्धिनी आणि सेवा सहयोग या संस्थांच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मयत पास देणे व पार्थिवाचे दहन करणे व अन्य कामे यासाठी पुणे महानगरपालिकेला मदत करीत आहोत.
गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोनाचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यासोबतच कोरोना मृत्यूंचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. ससून हॉस्पिटलमध्ये आणि वैकुंठ स्मशानभूमीत काम करणाऱ्या महापालिका कर्मचारी यासाठी रात्रंदिवस झटत आहे. परंतु कामाचा व्याप मोठा आहे. यासाठी याकामात युवकांची गरज होती. त्यासाठी सुराज्य सर्वांगीण विकास, ‘स्व’-रूपवर्धिनी आणि सेवा सहयोग या संस्थांच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदतीला स्वयंसेवकांचा संघ उपलब्ध करून दिला आहे. हे स्वयंसेवक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आधारकार्डसह माहिती देणाऱ्यांचे आधारकार्ड, शवागृहातील डॉक्टरांचे घोषणापत्र, नमुना क्रमांक दोन (सांख्यिकी) हे चार कागदपत्रे घेऊन पाच प्रतिमध्ये ‘मयत पास’ अवघ्या काही मिनिटीत ऑनलाइन देतात. या मयत पासमुळे नातेवाईकांना पार्थिवाचे दहन करणे व मृत्यू दाखला मिळविणे यासाठी उपयोगी पडतो.
संस्थेचे स्वयंसेवक दत्तात्रय खडके, हर्षद सोनवणे, विवेक शेलार, परशुराम हाके, रविराज शेलार, ओमकार खडके, विकास पोळ गेल्या २ मे पासून हे तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. त्यांनी पाच दिवसात साधारणत: ९५० मयत पास काढून दिले आहेत. तर वैकुंठ स्मशानभूमीत स्वयंसेवकांनी २५६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
ऑनलाइनमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी
ऑनलाइनमुळे मयत पासमुळे सामाजिक अंतर राखता येते. यासह कागदपत्रांची हाताळणी करण्याची आवश्यकता नाही. व्हॉटसॲप वेबमुळे झेरॉक्स घेण्यासाठी फिरण्याची गरज नाही. मोबाईलवर गावकडील कागदपत्रे सुद्धा सहज मागविता येतात. या सुविधेमुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा त्रास कमी होऊन कोरोनाचा संसर्गाची शक्यता कमी असल्याचे सुराज्य सर्वांगीण संस्थेचे विजय शिवले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.