पुणे - बनावट फेसबुक अकाउंटवरून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ४० वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुमीतदादा घुले पाटील नावाच्या बनावट फेसबुक खातेधारकाविरुद्ध रविवारी (ता. २०) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सामाजिक कार्यकर्ता असून, सॅलिसबरी पार्क परिसरात वास्तव्यास आहे.