पुणे : सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे हॉटस्पाट गावांमध्ये घट

Decline in hotspot villages due to super spreader survey srs97
corona
coronasakal
Updated on

पुणे: ‘‘सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या १०९ वरून ९५ पर्यंत कमी झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकेमध्ये १०, पिंपरी चिंचवडमध्ये ३, पुणे ग्रामीणमध्ये १२ ऑक्‍सिजन प्लॅंट कार्यान्वित झाले आहेत,’’ अशी माहिती पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. सुपर स्प्रेडर सर्वेक्षण नमुना तपासणीमध्ये औद्यागिक वसाहतींमधील कामगार, मजूर, बॅंक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आरटीपीसीआर नमुना तपासणी करण्यात येत आहे.

corona
...या अज्ञानामुळे देशात कृषी संकटापेक्षा ज्ञानाचे संकट मोठे

ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांवरही विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले. डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, ‘‘लहान मुलांच्या पावसाळ्यातील आजारांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी कुटुंबातील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करुन घेणे आवश्‍यक आहे.’’

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, यांच्यासह आमदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.