पुणे जिल्ह्यातील पहिले स्केटिंग रिंग व बास्केट बॉल मैदानाचे लोकार्पण

पुणे जिल्ह्यातील पहिले स्केटिंग रिंग व बास्केट बॉल मैदानाचे लोकार्पण सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSakal
Updated on

इंदापूर - महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवासंचनालय पुणे, (Pune) इंदापूर (Indapur) तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने ६० लाख रुपये खर्च करून इंदापूर तालुका क्रीडा संकुल मध्ये उभारलेल्या पुणे जिल्ह्यातील पहिले स्केटिंग रिंग (Skating Ring) व बास्केट बॉल मैदानाचे (Basket Ball Ground) लोकार्पण सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजनमंडळाचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला शहराध्यक्ष उमा इंगुले, उज्वला चौगुले, मंगला ढोले, दिलीप वाघमारे, श्रीधर बाब्रस, वसीम बागवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, धरमचंद लोढा, बाळासाहेब क्षीरसागर, तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे उपस्थित होते.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, तालुक्यात अनेक गुणवंत खेळाडू असून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयश संपादन करून तालुक्याचानावलौकिकउंचविणे गरजेचे आहे. तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेशचावले म्हणाले, पुणे जिल्ह्यामध्ये अव्वलक्रीडासंकुल म्हणून इंदापूरची ओळख निर्माण झालीआहे. बास्केटबॉल व स्केटिंग या खेळातून दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजेत हा दृष्टिकोन ठेवून या मैदानाची निर्मिती करण्यात आली असून पुढील काळामध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार जलतरण व वसतिगृहाची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. संकुल स्वयंपूर्ण बनविण्याचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.