मंचर :“आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द येथे होणाऱ्या कोविड जम्बो सेंटरसाठी प्रशासनाने २४ कोटी २४ लाख रुपये मंजूर केले आहेत. या केंद्रासाठी लोकसहभागाची नितांत गरज होती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला येथील संस्था व दानशूर यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. लोकसहभागातून जर्मनीहून ६६ लाख ६७ हजार ४० रुपये किंमतीचे १५ व्हेंटिलेटर व प्राप्त झाले आहेत. व्हेंटिलेटरचा उपयोग जम्बो कोविड सेंटरसाठी होईल. लोकसहभागाचा उपक्रम कौतुकास्पद आहे” असे आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांताधिकारी सारंग कोडीलकर यांनी सांगितले.
मंचर( ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात अवसरी खुर्द कोविड जम्बो सेंटरसाठी व्हेंटिलेटर व मॉनिटर लोकार्पण सोहळा झाला. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंबादास देवमाने, डॉ सुदाम खिलारी, मोरडे फुड्सचे बाळासाहेब मोरडे, पराग पतसंस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बांगर, श्री गणेश इंजिनिअरिंगचे चंद्रकांत घोडेकर, मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले, अवसरी खुर्दचे सरपंच जगदीश अभंग, खडकीचे सरपंच कृष्णा भोर, रितेश माने, जगदीश घिसे, सरस्वती शिंदे, अशोकराव निघोट, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. दानशूरांचा सन्मान करण्यात आला.
शहा म्हणाले “जम्बो कोविड सेंटरचा उपयोग लहान मुलांसाठी होणार आहे. या रुग्णालयासाठी शासनाप्रमाणेच लोक सहभाग व सीएसआर फंडातून ऑक्सिजन प्लांटसह अनेक अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होणार आहेत. कोरोना साथ आटोक्यात आल्यानंतर अन्य साथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी सेंटरचा उपयोग परिसरातील नागरिकांना होणार आहे. यापुढे उपचारासाठी एकही रुग्ण पुणे मुंबईला जाता कामा नये. त्यादृष्टीने उपाययोजना करा. अशा सूचना वळसे-पाटील यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार नियोजन सुरू आहे.”
दानशुराचे नाव- लॉजिक एस व्हेंटिलेटर व मॉनिटर संख्या : मोरडे फुड्स प्रायव्हेट लिमिटेड हर्षद मोरडे (तीन), भरत तुकाराम भोर, कमल राज असोसिएट मोहन थोरात, कमलेश गांधी (प्रत्येकी दोन), साईनाथ पतसंस्था, श्री कुलस्वामिनी पतसंस्था, श्रीकृष्ण पतसंस्था, श्री गणेश इंजिनिअरिंग सावता वाघमारे प्रत्येकी एक. व्हेंटिलेटर ३० सी व मॉनिटर : पराग पतसंस्था, पराग मिल्क फ्रुडस लिमिटेड,कमलेश शिंदे, राम ग्रामीण पतसंस्था, श्रीराम पतसंस्था, खडकी ग्रामस्थ प्रत्येकी एक.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.