पुण्यातील दीपक मारटकर यांचा खून अश्विनी कांबळे व महेंद्र सराफच्या सांगण्यावरूनच

Deepak-Maratkar
Deepak-Maratkar
Updated on

पुणे - शिवसेना कार्यकर्ते दीपक मारटकर यांचा खून अश्विनी कांबळे व महेंद्र सराफ यांच्या सांगण्यावरूनच झाला असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अश्विनी सोपान कांबळे (वय 25), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57) आणि निरंजन सागर म्हंकाळे (वय 19, तिघेही रा. बुधवार पेठ) यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी कोठडी सुनावली. गुन्ह्यातील फरार आरोपी व निरंजन हे गुन्हा घडण्यापूर्वी गंज पेठ परिसरात भेटल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे. गुन्हा घडल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये फरार आरोपी व निरंजन हे एकत्रित असल्याचे दिसून येत आहे. नियोजनबद्धरीत्या कट रचून हा गुन्हा केला आहे. अटक आरोपींनी गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याची माहिती सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी न्यायालयाला दिली.

मारटकर यांचा शुक्रवारी (ता.2) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी आळी समोरील रस्त्यावर खून झाला आहे. या प्रकरणी राहुल भगवान आलमखाने (वय 43, रा. गवळी आळी, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अटक आरोपींसह सनी कोलते, संदीप ऊर्फ मुंगळ्या कोलते (दोघे रा. सुखसागरनगर), रोहित ऊर्फ बाळा कांबळे, राहुल ऊर्फ पांड्या रागीर (दोघे रा. लोहियानगर), लखन ऊर्फ अण्णा धावर (रा. पंढरपूर) आणि रोहित क्षीरसागर (रा. गंज पेठ) यांच्या विरोधात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरंजन हा मारटकर यांच्या शेजारी राहण्यास असून त्यांच्या प्रत्येक हालचालींबाबत त्याने आरोपींना माहिती पुरविली का? तसेच गुन्ह्याबाबत आणखी तपास करायचा असल्याने ऍड. क्षीरसागर यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.