Fake Notes : बनावट नोटाप्रकरणी सहा अटकेत

बनावट नोटाप्रकरणी देहूरोड पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. आरोपींनी नोटा छापण्यासाठी पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून जुने ऑफसेट मशिन आणले होते.
Counterfeit Notes
Counterfeit Notessakal
Updated on

पिंपरी : बनावट नोटाप्रकरणी देहूरोड पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. आरोपींनी नोटा छापण्यासाठी पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून जुने ऑफसेट मशिन आणले होते. दिघी येथील मॅगझीन चौकात बनावट नोटा छापण्याचा हा उद्योग सुरू होता. त्यातील एक आरोपी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील पदविकाधारक आहे.

किवळे येथील मुकाई चौकात ही कारवाई करण्यात आली. ऋतिक चंद्रमणी खडसे (वय २२, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, मूळ रा. मंगरुळपीर, जि. वाशीम), सूरज श्रीराम यादव (वय ४१, रा. चऱ्होली), आकाश विराज धंगेकर (वय २२, रा. आकुर्डी, मूळ रा. अंबाजोगाई, जि. धाराशिव), सुयोग दिनकर साळुंखे (वय ३३, रा. आकुर्डी, मूळ रा. दुधवंडी, ता. पलूस, जि. सांगली), तेजस सुकदेव बल्लाळ (वय १९, रा. अरणगाव, ता. भूम, जि. धाराशिव), प्रणव सुनील गव्हाणे (वय ३०, रा. आळंदी रस्ता, भोसरी ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

छपाईचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ऋतिक, सूरज आणि त्यांचे इतर साथीदार एकत्र आले होते. त्यासाठी दिघी येथील एक गाळा त्यांनी भाडेतत्त्वावर घेतला. छपाईचे एक जुने ऑफसेट मशिन त्यांनी पुण्यातून आणले. त्यावर पत्रके तसेच इतर छपाईची कामे करण्याची त्यांनी तयारी केली. मात्र, त्यांना छपाईची कामे मिळाली नाहीत. त्यामुळे गाळ्याचे भाडे आणि इतर खर्च वाढला. त्यातून आर्थिक बोजा पडत असल्याने काही तरी वेगळे करण्याचे त्यांनी ठरवले.

Counterfeit Notes
Pune Weather : किमान तापमानाची उच्चांकी नोंद ; चार वर्षांमधील पुणे शहरातील स्थिती

‘मला नोटांचे डिझाइन करता येते. चलनी नोटा छापल्यास आपल्याला मोठा फायदा होईल’, अशी कल्पना सूरजला सुचली. त्यानुसार त्यांनी चीन येथून ऑनलाइनद्वारे तेजस बल्लाळच्या पत्त्यावर कागद मागवला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ७० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली. या नोटा देण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला. एक लाखाच्या बनावट नोटांच्या बदल्यात ४० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ऋतिक हा ७० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा घेऊन किवळे येथील मुकाई चौकात आला. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.