गणेशमूर्तीकारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

bappa1.jpg
bappa1.jpg
Updated on

सुपे (पुणे) : कोरोनामुळे यंदा विक्रीअभावी सुमारे निम्म्या गणेशमूर्ती शिल्लक राहिल्या. परिणामी गणेश कारागिरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई सरकारकडून मिळण्याची अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. 

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेलद्वारे ही मागणी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय मातीकला विभागाचे अध्यक्ष दत्तात्रेय कुंभार यांनी दिली. ते म्हणाले - राज्यातील २५ हजार पेक्षा अधिक कुटूंबांचा उदरनिर्वाह गणेश मुर्तींवर अवलंबून आहे. कोरोनाचे थैमान चालू होण्याआधी ४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या सुमारे १० हजार पेक्षा अधिक मुर्ती तयार झाल्या होत्या. ४ फुटांपेक्षा अधिक मुर्तींना सरकारने बंदी घातल्यामुळे अंदाजें ७०० कोटी रुपयांच्या मूर्ती कारागिरांकडे पडून आहेत.

जागेअभावी या मूर्ती खराब होणार आहेत. तर लहान मुर्तींची विक्रीही ५० टक्केच झाल्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे. हा व्यवसाय मुख्यता खासगी कर्ज घेऊन होत असल्याने सदरची कर्जफेड करणे मुश्किल आहे. कुंभार समाज शांतता प्रिय असून, आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून प्रक्षोभ वाढेल किंवा राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होईल अशी आंदोलने केली नाहीत. 

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिल्लक मुर्तींचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी व या मुर्तींचे विसर्जन करण्याची मागणी पाठवलेल्या मेलद्वारे केली आहे. झालेल्या नुकसानीचे गांभीर्य सरकारच्या लक्षात येण्यासाठी कुंभार गणेशमूर्ती कारागिरांनी मेल पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षांनी कोरोनामुळे शिल्लक मूर्ती व कारागिरांची यादी करून जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना निवेदन देण्याचे आवाहन राष्ट्रीय मातीकला विभागाचे अध्यक्ष दत्तात्रेय कुंभार, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक मोहन जगदाळे, प्रदेशाध्यक्ष श्याम राजे, राजेंद्र सावंदे, मनोहर जाधव, तुषार गारे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.