अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा करण्याची मागणी

'पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच लंपी आजारामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.
Mahesh Landage Madhuri Misal and Dr Rajesh Deshmukh
Mahesh Landage Madhuri Misal and Dr Rajesh Deshmukhsakal
Updated on
Summary

'पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच लंपी आजारामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.

मंचर - 'पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच लंपी आजारामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून लंपी आजराविषयी लसीकरण व जनजागृती करावी.' अशी मागणी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ,आमदार महेश लांडगे, भाजपच्या नेत्या आशा बुचके, भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील, किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, नवनाथ थोरात यांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे केली.

पुणे येथे नुकतेच शिष्ठमंडळ डॉ.देशमुख यांना भेटले. पंचनाम्याची कामे गतिमान पद्धतीने करावीत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित आहेत. त्यासाठी जनजागृती करून तालुकास्तरीय मेळावे आयोजित करून लाभार्थ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी. तसेच पावसामुळे गुरांचा चारापिके वाया गेली आहेत. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी.रस्ते दुरुस्ती व अन्य समस्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. असे थोरात यांनी सांगितले.

'लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करून जिल्हा व तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली जाईल. प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील.' असे डॉ.देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.