Udaan Yojana : ‘उडान’ योजनेसाठी दहा स्लॉटची मागणी ; पुणे विमानतळाकडून केंद्रीय मंत्र्यांना ई-मेल

उन्हाळी सुट्टीचा हंगाम लवकरच सुरू होईल. सद्यःस्थितीत पुणे विमानतळावर क्षमतेपेक्षा २८ टक्के जास्त प्रवासी वाहतूक होत आहे. तेव्हा प्रवाशांसाठी नवीन टर्मिनल तत्काळ सुरू व्हावे, तसेच ‘उडान’ योजनेचा विस्तार करण्यासाठी रोजचे किमान १० स्लॉट विमानांसाठी राखीव ठेवाव्यात,
Udaan Yojana
Udaan Yojanasakal
Updated on

पुणे : उन्हाळी सुट्टीचा हंगाम लवकरच सुरू होईल. सद्यःस्थितीत पुणे विमानतळावर क्षमतेपेक्षा २८ टक्के जास्त प्रवासी वाहतूक होत आहे. तेव्हा प्रवाशांसाठी नवीन टर्मिनल तत्काळ सुरू व्हावे, तसेच ‘उडान’ योजनेचा विस्तार करण्यासाठी रोजचे किमान १० स्लॉट विमानांसाठी राखीव ठेवाव्यात, अशी मागणी हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी केली आहे.

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल पाच महिन्यांपासून तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होण्याच्या प्रतीक्षेत आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या टर्मिनलवर कॅबसारख्या वाहनांना पीकअपसाठी परवानगी नाकारली आहे. तेव्हा प्रवाशांच्या सोयीसाठी ही परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केली आहे.

Udaan Yojana
Pune News : हॉटेल, पबवर राहणार पोलिस पथकांचा ‘वॉच’ ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

या आहेत अन्य मागण्या...

  • पुणे विमानतळावर प्रवाशांना पादचारी पूल ते जुने टर्मिनल इमारत दरम्यान एकच छोटी लिफ्ट असून तिची क्षमतादेखील खूप कमी आहे. या ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या लिफ्टची गरज आहे.

  • जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) नियुक्ती करावी.

  • पुण्यातून उड्डाणाची वाढती संख्या पाहता लोहगाव विमानतळावर प्रवासी विमान कमी दृश्यमानतेत सुरक्षितपणे टेक-ऑफ व लँडिंग करू शकतील, यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवावी.

  • अधिकारी-जवानांसाठी नवीन टर्मिनल येथे विश्रामगृह उपलब्ध करावे.

  • विद्यमान धावपट्टीचा किमान तीन हजार फूट विस्तार करण्याची गरज असून, तो लवकर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.