Uruli Kanchan Crime : कोयत्याने जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

'दर महिन्याला पाच हजार रुपये दे, नाहीतर तुला व तुझ्या वडिलांना कोयत्याने तोडून जिवे ठार मारील.
Crime
Crimesakal
Updated on

उरुळी कांचन - कोयत्याने जीवे मारण्याची धमकी देऊन एका दुकानदाराकडे दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणी मागणाऱ्यावर उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दत्ता दिगंबर ठोंबरे (वय-३८, रा. हरिजीवन हॉस्पिटलच्या मागे, उरुळी कांचन ता. हवेली) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहन सतिश आच्छा (वय-३५, रा. आश्रम रोड, परिवर्तन सोसायटी, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन आच्छा यांचे तुपे वस्ती परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. फिर्यादी यांचे वडील सतिश आच्छा हे गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मालाच्या दुकानात होते. त्यांच्यासोबत कामगार महेंद्र मधुकर पाटील, गणेश सैदुबा माथले तसेच तेजस लखन खेडेकर होते. त्यावेळी तेथे आरोपी दत्ता ठोंबरे आला.

तो फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना म्हणाला की, 'दर महिन्याला पाच हजार रुपये दे, नाहीतर तुला व तुझ्या वडिलांना कोयत्याने तोडून जिवे ठार मारील, तसेच 'मी थोड्या वेळाने परत येइल तेव्हा मला पाच हजार दे, नाही दिले तर मी तुमच्याकडे बघतो, मी पोलिसांना व कोणालाच घाबरत नाही, माझ्यावर खूप केसेस आहेत'. असे म्हणत धमकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.