Juni Sangavi News : आमची घरे पाडली तर तुमचे सरकार पाडू; निळ्या पुररेषेतील अनधिकृत घरांवर होणा-या कारवाईविरोधात जन आक्रोश

पिंपरी-चिंचवड शहरातील निळ्या पुररेषेतील अनधिकृत बांधकामे घरे दुकाने पाडण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. यात महापालिकेकडून सर्व्हेक्षण सुरू आहे.
Flex in juni Sangavi
Flex in juni Sangavisakal
Updated on

जुनी सांगवी - पिंपरी-चिंचवड शहरातील निळ्या पुररेषेतील अनधिकृत बांधकामे घरे दुकाने पाडण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. यात महापालिकेकडून सर्व्हेक्षण सुरू आहे. मुळा, पवना, इंद्रायणी आदी भागातील पुररेषेतील बांधकामे काढून टाकण्यात येणार असल्याने राहती घरे दुकाने वाचविण्यासाठी याविरोधात जन आंदोलन उभे राहत आहे.

जुनी सांगवी येथील मुळा नदी किनारा भागातील बाधितांनाही याची झळ पोचणार आहे.याचबरोबर रस्तारूंदिकरणा दरम्यान येथील काही रहिवासी घरांना या कारवाईचा फटका बसणार आहे. याबाबत बाधितांना भुसंपादन विभागाकडून नोटीसा, खुलासा व चर्चाही घडल्या आहेत. शहर व उपनगरात कष्टकऱ्यांची घरे आहेत.

घर गेल्यास बेघर व्हावे लागणार असल्याने निळी पुररेषा रहिवासी संरक्षण समितीच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात जन आंदोलन उभे राहत आहे. जुनी सांगवी संगमनगर चौकात या निर्णया विरोधात फलक लावून आमची घरे पाडली तर आम्ही तुमचे सरकार पाडू अशा आशयाचा मजकूर लिहून प्रशासनाला व सत्ताधा-यांना गर्भित इशारा दिला आहे. या फरकाची सध्या सांगवी परिसरात चर्चा होत आहे.

सांगवी बोपोडी पुलाचे काम पुर्ण झाले असून सुशोभीकरणाच्या कामानंतर हा पुल रहदारीसाठी खुला होईल तेव्हा मुळा नदी किनारा रस्ता रहदारीस अपुरा पडणार असल्याने परिसरातील रस्ता रुंदिकरणात येणा-या घरांवर कारवाई होणार असल्याची टांगती तलवार आहे.पुलाचे काम पुर्ण झाल्याने रहिवासी नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

कारवाई थांबवून जैसे थे घरे राहावीत या मागणीसाठी जन आंदोलन उभे राहात आहे.याबाबत निळी पुररेषा रहिवासी संरक्षण समितीच्या वतीने शहरभर आंदोलन उभे करण्यात येत आहे. याची सुरुवात सांगवीतून करण्यात येत आहे. याबाबत मंगळवार ता.२२ समितीकडून बाधित रहिवाशांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()