वानवडीतील भैरोबा नाल्यावरील जुना पूल पाडण्यास सुरुवात

वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइट हाउसिंग सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पूल सोमवारी पाडण्यास सुरुवात केली आहे.
Demolition of the old bridge over the Bhairoba drain
Demolition of the old bridge over the Bhairoba drainsakal
Updated on
Summary

वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइट हाउसिंग सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पूल सोमवारी पाडण्यास सुरुवात केली आहे.

घोरपडी - वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइट हाउसिंग सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पूल सोमवारी पाडण्यास सुरुवात केली आहे. पुणे महानगर पालिकेच्या वतीने सकाळी वानवडी आणि आर्मी परिसरात बॅरिगेट लावून हा रस्ता दोन्ही बाजूनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा पूल साधारण शंभर वर्षे जुना आहे. पूल कमी उंचीचा असल्याने पावसामुळे भौरोबा नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यावर या पुलावरून दोन ते अडीच फूट उंचीवरून पाणी वाहते. यामुळे अनेक अपघात घडले आहेत. 

जुना पूल पडल्यानंतर या ठिकाणी तीन महिन्यात नवीन पूल बांधण्यात येणार आहे. नवीन पूल साधारण २४ मीटर लांबी व १२ मीटर रुंदीचा असून जुन्या पूलापेक्षा नवीन पुलाची एक ते दीड मीटरने उंची वाढणार आहेत. हा पूल बांधण्यासाठी पालिकेकडून 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हा पूल पुणे कॅन्टोमेंट आणि वानवडी परिसराला जोडणारा महत्वाचा पूल आहे. साधारण दररोज रोज हजार वाहनांची येथून ये- जा होत असते. त्यामुळे या जुन्या पुलावरची वाहतूक गंगा सॅटेलाइट बाहेरील एका छोट्या पुलावरून वळवली. पूल हा तात्पुरता पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध करून दिला आहे. या पुलावर संरक्षणासाठी लोखंडी कठडे बसविले आहेत. परंतु रस्त्यावर डांबरीकरण केले नाही, तसेच पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातांची भीती निर्माण झाली आहे.

मोहल्ला कमिटी मध्ये खूप दिवस आधी सांगितले होते, पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण केल्याशिवाय पूल तोडू नये. परंतु मनपाने काम सुरू केले. जो पर्यायी मार्ग दिला आहे , त्याची स्थिती अतिशय वाईट असून गाडी चालवताना रस्त्यावरील दगड उडतात, ते इतर वाहनचालकांना लागून अपघात होऊ शकतो. डांबरीकरण व पथदिवे आवश्यक असून त्याचे तातडीने काम करावे.

- आसपी मिस्त्री, स्थानिक रहिवासी

डांबरीकरण व पथदिवे याबाबत आम्ही मुख्य खात्याकडे मागणी केली असून लवकरच हे पूर्ण होईल.

- गणेश पुरम, कनिष्ठ अभियंता मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.