गेल्या आठवड्यात पावसाने पुणे आणि परिसरला पावसाने झोडपले आहे. यासह खडकवासला धरण प्रकल्पातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा विसर्ग गरण्यात आला होता. त्यानंत शहरात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
आता धरणांतून सोडण्यात येणार विसर्ग कमी केल्या शहरातील पाणी ओसरले आहे. मात्र, हे पाणी ओसरल्यानंतर रोगराईचे प्रमाण वाढले आहे.
अशात शहरात डेग्यूचे 389 रूग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात पाऊसानंतर आता रोगराईने थैमान घातले आहे.
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून पुण्यात झिकाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. झिकाच्या रुग्णांची संख्या आता 37 वर पोहचल्याने महानगर पालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर चिकनगुनियाचेही काही रूग्ण सापडल्याने चिंता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.