Pune Lok Sabha Election : पोलिसांचा चोख बंदोबस्त, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल बाळगता येणार नाही. मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रणास बंदी राहील.
deployment of police for security at vicinity of polling booths lok sabha election
deployment of police for security at vicinity of polling booths lok sabha election Sakal
Updated on

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्याचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस सह आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान होणार आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. तसेच, शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील काही भागाचा समावेश होतो. या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल बाळगता येणार नाही. मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रणास बंदी राहील. ज्वलनशील वस्तू आणि शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या परिसरातील प्रतिबंधात्मक आदेश उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती भा.दं.वि. कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे पोलिस सह आयुक्त पवार यांनी आदेशात नमूद केले आहे.

मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यात पुणे शहर पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह, केंद्रीय राखीव पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बल आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- प्रवीण पवार, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com