दवाखाने, शाळा पालिकेत वर्ग करा; उपमुख्यमंत्र्यांची सूचना

दवाखाने, शाळा पालिकेत वर्ग करा; उपमुख्यमंत्र्यांची सूचना
SYSTEM
Updated on

मुंबई : पुणे महापालिकेत समावेश झालेल्या ११ गावांतील सरकारी दवाखाने, शाळा, पाणी पुरवठा योजना, अंगणवाड्या, अधिकारी व कर्मचारी यांना महापालिकेत वर्ग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच नव्याने समावेश होणाऱ्या २३ गावांतील यंत्रणाही महापालिकेत समावून घेण्यात येईल; मात्र त्याची कार्यवाही अधिसूचना निघाल्यानंतर होणार आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी याबाबत अंतिम आदेश निघण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेतील विविध प्रश्नांवर पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे राजेंद्र निंबाळकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

दवाखाने, शाळा पालिकेत वर्ग करा; उपमुख्यमंत्र्यांची सूचना
आता झोपडपट्टीत जाऊन करणार लसीकरण

हद्दीलगतची ११ गावे महापालिकेत घेऊन आता जवळपास चार वर्ष झाली, तरीही तेथील शाळा, दवाखाने, अंगणवाड्या आणि अन्य यंत्रणा जिल्हा परिषदेकडे आहे. यामुळे महापालिकेच्या कामात अडचणी येत असून गावकऱ्यांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे ही यंत्रणा महापालिकेत समावून घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. या गावांतील यंत्रणा महापालिकेत सामावून घेण्यास हरकत नसल्याचे या वेळी मुश्रीफ व पाठक यांना सांगितले.

अधिसूचनेबाबत उत्सुकता

नवी २३ गावे महापालिकेत घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू असून, त्याबाबत गावांमधील रहिवाशांकडून मागविलेल्या हरकती-सूचनांचा अभिप्राय स्थानिक प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यावर अंतिम कार्यवाही अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महापालिकेची निवडणुका येत्या फेब्रुवारीत होणार असल्याने गावे सामावून घेण्याची अधिसूचना नेमकी कधी निघणार?, याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती

महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी पवार यांनी व्यूह रचना आखण्यात येत आहे. प्रभागरचनेत बदल आणि हद्दीलगतची २३ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत आगामी दिवसांत अधिसूचना काढून निवडणुकीची तयारी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

दवाखाने, शाळा पालिकेत वर्ग करा; उपमुख्यमंत्र्यांची सूचना
पुणे जिल्ह्यात पावणेचार लाख मतदार छायाचित्राविना

खराडी रस्त्याबाबत सूचना

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शिवणे-खराडी रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना अजित पवार यांनी महापालिकेला दिल्या. या रस्त्याच्या मूळ योजनेत बदल करून तो नदीलगत ‘डबल डेकर करता येईल का’, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या (एनजीटी) नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेऊनच नव्या योजनेची आखणी केली जाणार आहे. याबाबत नगरसेवक सचिन दोडके यांनी मुद्दा मांडला.

पाणीयोजनांचे हस्तांतर करा

महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावा. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे- धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.