'मलासु्द्धा सोसावं लागतं'; असं का म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

Ajit_Pawar
Ajit_Pawar
Updated on

बारामती (पुणे) : अजित पवार यांच भाषण म्हणजे नेहमीच नर्मविनोदी आणि रोखठोक शैलीतील विवेचन असते. त्यांच्या भाषणात ते नेहमीच विनोद करत वातावरण हलकं-फुलकं करण्याचा प्रयत्न करीत असतात. बारामती नगरपालिकेच्या भूमिपुजन कार्यक्रमाच्या सभेदरम्यानही अजित पवार यांनी एकीकडे रोखठोक इशारा देतानाच दुसरीकडे 'आपणही सोसतो...' असं मिश्किलपणे पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहून सांगितलं, तेव्हा उपस्थिताना हसू आवरलं नाही. 

बारामतीकरांना लवकरच भूमfगत पाईपमधून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर आणण्याच्या कटकटीपासून मुक्तता होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती देत बारामतीकर पतींना चिमटे घेतले. ते म्हणाले, आता ही सोय झाल्यानंतर पत्नीने सिलिंडर आणायला सांगितले तरी तिला 'ऐ...शहाणपणा करु नको, गॅस घरी येणार आहे. नुसती तोटी उघडली की गॅस सुरु,' असे उत्तर तुम्ही देऊ शकता.

काही क्षण थांबून मिश्किलपणे व्यासपीठावर बसलेल्या पत्नी सुनेत्रा यांच्याकडे पाहत अजित पवार म्हणाले, 'पण मला तसं म्हणता येणार नाही, मला ऐकावं लागेल, नाहीतर माझाच शहाणपणा निघायचा,' अशी टिप्पणी पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. उपमुख्यमंत्री असलं तरी त्यांनाही पत्नीचा आदरयुक्त धाक असतो, हेच उपमुख्यमंत्री पवार यांनी दाखवून दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.