पुणे : एकीकडे केरळमध्ये गर्भवती हत्तींनीला स्फोटके भरलेले अननस देऊन मृत्यूच्या भोवऱ्यात टाकलेले प्रकरण आपण सर्वांनी वाचले व हळहळ व्यक्त केली. भुतदया व त्याविषयची संवेदना हल्ली नष्ट होत असताना पुण्याचे सुपूत्र उप महाराष्ट्र केसरी पहिलवान महेश मोहोळ यांनी एका जखमी गर्भवती हरणीचे प्राण वाचवून भुतदयेचे अनोखे उदाहरण आज दिले.
आज सकाळी नांदेड सिटी येथे भटकत आलेले एक हरीण प्लास्टिक कागदाचे वेटोळे पायात गुंतून जखमी अवस्थेत आले असताना मोकाट कुत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर हल्ला चढवला होता. मोहोळ हे सकाळी व्यायामाला जात असताना कुत्र्यांचा गोंगाट ऐकून जवळ गेले असता त्यांना हरीण जखमी अवस्थेत दिसली. त्यांनी तात्काळ कुत्र्यांना हालकून हरणीच्या जवळ जाऊन पाहणी केली आणि जवळच असणाऱ्या आपल्या घरी नेऊन तिच्यावर प्रथमोपचार केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
घाबरलेली हरीण या उपचाराने स्थिर झाली. त्यानंतर मोहोळ यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क केला व त्यानंतर वन विभागाचे पथक घरी आले. वन विभागाने हरणीला ताब्यात घेतले. हरणीला उपचार करुन पुन्हा जंगलात सोडले जाणार असल्याची खात्री करुन महेश मोहोळ यांनी ती हरीण वन खात्याकडे सुपूर्द केली.
मोहोळ यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.