हडपसर - अरुंद व खिळखिळे रस्ते, नियमांची पायमल्ली, पदपथासह मुख्य रस्त्यावर होत असलेले व्यवसायिकांचे अतिक्रमण, पार्किंगचा अभाव आणि या सर्वावर नियंत्रण ठेवणारी तकलादू प्रशासन व्यवस्था यामुळे हडपसर परिसरातील वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस जटील स्वरूप धारण करीत आहे. वाहतूक नियंत्रणाबाबत पालिका व पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने हा प्रश्न अधिकच उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. त्यामुळे येथील नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.