प्रेग्नंट असतानाही देवकीचे नऊ महिने शूट

मातृत्वाचे डोहाळे लागले असताना मिळाली सकारात्मक ऊर्जा
 सुख म्हणजे नक्की काय असतं?देवकी
सुख म्हणजे नक्की काय असतं?देवकीsakal
Updated on

पुणे : सुख म्हणजे नक्की काय असतं?? हा सर्वांनाच पडणारा प्रश्न आहे. पण याच मालिकेतील देवकी अर्थात मीनाक्षी राठोड हिने प्रेग्नंट असतानाही चक्क नऊ महिने न थकता, न चिडचीड करता मालिकेच चित्रीकरण केले अन स्त्रीयांमध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जेचे प्रचिती आणून दिली.

स्टार प्रवाह या वाहिनीवरील "सुख म्हणजे नक्की काय असतं" या मालिकेत देवकी अर्थात मीनाक्षी राठोडची भूमिका नॉटी, खोडकर स्वरूपाची आहे. त्यामुळे तिला उडया मारणे, मस्ती करणे, वेगवेगळे ट्विस्ट निर्माण करण्याचे आव्हान आहे. त्यातच ती रिअल लाइफमध्ये प्रेग्नंट असून आता नवव्या महिन्यातील दुसरा आठवडा सुरु आहे. मात्र, तिने पहिल्या दिवसापासून आजपर्यंत एकदाही शूटिंगला दांडी मारली नाही.

मातृत्वाचे डोहाळे लागले असतानाही तिने चक्क "वर्किंग वूमन"ची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडली. नऊ महिन्यात नक्की काय केलं, याविषयी मीनाक्षीने आपला दिनक्रम अन आलेले अनुभव, आव्हान आणि त्यावर केलेली मात खास "सकाळ"ला सांगितली.

मीनाक्षी म्हणाली, ज्यावेळी मी प्रेग्नंट होते, त्यावेळी मी नऊ महिने शूट करू शकेल असं वाटत नव्हत. दोन- तीन महिने मी आरामशीरपणे शूट केले. त्यातून मला आनंद मिळू लागला. मग मी विचार केला की, पुढेही जेवढे शक्य होईल, तेवढे शूट करूयात अन बोलता-बोलता नऊ महिने कसे झाले हे कळलेच नाही. मात्र, या कालावधीत माझे सहकारी कलाकार, सेटवरील सर्वजण अन् प्रॉडक्शन हाऊसने मला भक्कम साथ तर दिलीच; पण माझी तेवढी काळजीही घेतली. त्यामुळे हा सर्व प्रवास आनंददायी झाला.

वर्किंग वुमन्सचा आदर्श

गावाकडे महिला प्रेग्नंट असतानाही भर उन्हाळा, पावसाळी अन हिवाळ्यात आठ- नऊ तास शेतात काम करून पुन्हा घरातील काम करतात. त्याचबरोबर उद्योग- व्यवसाय, ऑफिसमध्येही महिला भरपूर काम करतात. त्यांच्यात इतकी एनर्जी येते, मग आपणही त्यांचा आदर्श घेवू, असं मी ठरवल अन आलेल्या आव्हानांवर मात करत दररोज दहा- बारा तास चित्रीकरण केल्याचे मीनाक्षी हिने सांगितले.

नवऱ्याची मोलाची साथ

माझा नवरा कैलास वाघमारे हा कलाकार असल्याने त्याने माझ्या धाडसाचं कौतुक केलं अन मला भक्कम साथ दिली. मला काही खावस वाटलं की तो लगेच मला सेटवर आणून देत असे. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे फळं, ट्रायफ्रुटस, हेल्दी आहार मला कसा मिळेल, याची तो काळजी घेत होता. माझ्यात एनर्जी राहण्यासाठी मी द्राक्ष, चिकू, सफरचंद, टरबूजाचा ज्यूस अन दूध पित असे. दोन- तीन तासांनी मी काही ना काही खात असल्याचे मीनाक्षीने आवर्जुन सांगितले.

स्ट्रेन्थची जाणीव झाली

प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा असते; पण ती आपल्याला वेळ आल्याशिवाय कळत नाही. खरंतर मी खुप झोपाळू. पण, या कालावधीत मी खुप काम केले. सातव्या महिन्यापर्यंत मला फारसा थकवा जाणवला नाही. मात्र, सातव्या महिन्यानंतर वजन वाढायला लागले, दम लागणे, लक्ष विचालित होणे, पोटात बाळ असल्याची जाणीव होणे या गोष्टी कळायला लागल्या. स्त्री म्हणून माझ्यात बदल होत गेले. अशा काळात मी दिवसाला सहा- सात सिन शूट करत होते अन त्यातूनच मला माझ्यात असलेल्या सकारात्मक उर्जेची जाणीव झाल्याचे मीनाक्षी म्हणाली.

त्रासाला केले इग्नोर

प्रेग्नंट असताना प्रत्येक महिलेला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा शारिरिक त्रास होत असतो. माझ्या बाबतीतही ते झाले. पण, मी मानसिकरित्या भक्कम राहिले. स्त्रीयांमध्ये खुप सहनशक्ती असते, याची प्रचिती या काळात आली. त्यामुळे त्रासाकडे दुर्लक्ष केले. नैसर्गिकरित्या अन आनंदी राहून मी काम करत राहिले. यात कुटुंबाबरोबरच सेटवरील सर्वांनी साथ दिली, त्यामुळेच मी यशस्वीरित्या वर्किंग वुमनची भूमिला पार पाडू शकले, याचा मला अभिमान असल्याचे मीनाक्षी सांगते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.