सावरकर हातकड्यांची चिपळी बनवून तुकोबांचे अभंग गायचे : PM मोदी

देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचं रुप असल्याचे मोदी म्हणाले.
सावरकर हातकड्यांची चिपळी बनवून तुकोबांचे अभंग गायचे : PM मोदी
Updated on

पुणे : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, विकास आणि परंपरा या दोन्ही गोष्टी एकत्रित पुढे गेल्या पाहिजे. भाषणाला सुरुवात करताना मोदी म्हणाले की, भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना मी वंदन करतो. आज देहूच्या या पवित्र भूमिवर येण्याचे सौभाग्य लाभले असून, हे स्थळ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीदेखील आहे. देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. असे म्हणत येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचे रुप असल्याचे मोदी म्हणाले. (PM Modi Speech In Dehu)

सावरकर हातकड्यांची चिपळी बनवून तुकोबांचे अभंग गायचे : PM मोदी
मोदी तुकोबारायांचे चिरंजीव म्हणून आलेत; देहू संस्थानचे अध्यक्ष

यावेळी मोदी म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव, तसेच मुक्ताबाई या संतांच्या समाधीचे 725 वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केले असून, भारताला गतीशील ठेवले असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा ते तुकाराम महाराजांचे अभंग तुरुंगात म्हणत असे यावेळी मोदींनी सांगितली.

भारत जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शास्वत आहे.

सावरकर हातकड्यांची चिपळी बनवून तुकोबांचे अभंग गायचे : PM मोदी
शिळा मंदिर केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे सांस्कृतीक भविष्य घडणारी संस्था - PM मोदी

मागील काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला लागभल्याचे सांगत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली. या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

सावरकर हातकड्यांची चिपळी बनवून तुकोबांचे अभंग गायचे : PM मोदी
विमानातून उतरताच मोदींनी ठेवला अजित पवारांच्या खांद्यावर हात!

मोदी म्हणाले की, आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्य केलेली असेल, जी शिळा तुकाराम महाराजांचे वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. देहूतील संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर सांस्कृतिक भविष्य घडवणारं मंदिर आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.