Ajit Pawar : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास प्राचीन रूप कायम ठेवा: उपमुख्यमंत्री अजित पवार

पवार म्हणाले, प्रवेशद्वार आणि पायऱ्यांचे काम जुन्या पद्धतीने करावे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवारesakal
Updated on

मंचर : श्री क्षेत्र . भीमाशंकर परिसराचा विकास करतांना परिसराचे प्राचीन रूप कायम ठेवावे, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .

उपमुख्यमंत्री अजित पवार
Nandurbar Crime News: पूर्ववैमनस्यातून मारहाणीत एकाचा खून; संशयितांच्या मागणीसाठी नागरिकांचा पोलिस ठाण्यावर ठिय्या

पुणे -विधान भवनयेथे शुक्रवारी (ता.१४) भीमाशंकर परिसर विकासआराखडा कामकाजाच्या झालेल्याआढावा बैठकीत पवार बोलत होते यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीरावआढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील,भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश चौधरी, मधुकर गवांदे रत्नाकर कोडीलकर,संजय गवारी, मारुती भवारी,प्रकाश घोलप नंदकुमार सोनावळेआदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार
Palghar News: अतिवृष्टीमुळे पीकअप शेड जमीनदोस्त, जिवीतहानी टळली!

पवार म्हणाले, प्रवेशद्वार आणि पायऱ्यांचे काम जुन्या पद्धतीने करावे. विश्रामगृह आणि पोलीस ठाणे इमारतीचा आराखडा मंदिराप्रमाणे प्राचिन रुप दिसेल या पद्धतीने करावा. पायऱ्यांसाठी घडाई केलेले दगड वापरावे जेणेकरून चालतांना भाविकांना सुविधा होईल. परिसरातील घरातील सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारून त्याचे पाणी मंदिराच्या परिसरापासून दूर सोडावे, असे निर्देश त्यांनी दिले. विकास आराखड्यातील कामांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना सुंदर परिसराला भेट देण्याचे समाधान मिळेल यादृष्टीने कामे करावीत. येथील सुविधांसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्यास तोदेखील देण्यात येईल, असेही श्री.पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार
Nashik News : शाळेचा पहिला दिवस होणार अविस्मरणीय; शैक्षणिक जागृतीसाठी शिक्षकांचा पुढाकार

वळसे पाटील म्हणाले, दर शनिवार व रविवारी साधारण ५० हजार भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठीयेतात. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वीज आणि वाहतूक या बाबींवर विशेष लक्ष द्यावे. मंदिरात येणारी भाविकांची संख्या लक्षात घेवून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावा. कामे दर्जेदार व गतिमान पद्धतीने करावी..श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी देण्यात आलेल्या मिनी बसेसचा उपयोग भाविकांना नियमितपणे होईल याकडे लक्ष द्यावे, वृद्ध भाविकांची काळजी घ्यावी .

जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सादरीकरणाद्वारे विकास आराखड्यातील कामांची माहिती दिली. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत १४८ कोटी ३७ लाख रुपयांची विकासकामे करण्यात येत आहेत. मंदिराच्या सभामंडपाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होईल. मुख्य मंदिर संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पेशवे बारव, श्री क्षेत्र भीमाशंकर भीमा नदी प्रवाह, कळमजाई मंदिर जतन व संवर्धनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. भीमाशंकर-मंचर रस्त्याचे कामही करण्यात आले असून शौचालयांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.