MPSC Protest : देवेंद्र फडणवीसांचा एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, म्हणाले…

Devendra Fadanvis on Pune MPSC student protest against new mpsc exam pattern
Devendra Fadanvis on Pune MPSC student protest against new mpsc exam pattern
Updated on

पुणे : एमपीएसी परीक्षा पध्दतीत आयोगाकडून करण्यात आलेले बदल हे २०२३ एवजी २०२५ पासून लागू करावेत या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आज देखील पुण्यातील अल्का टॉकिज चौकात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अराजकीय 'साष्टांग दंडवत' आंदोलन करण्यात आले.

या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना फोनवरून दिलासा दिला.

आज करण्यात आलेल्या अराजकिय "साष्टांग दंडवत" आंदोलनात आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार हे सहभागी झाले होते.यावेळी पडळकरांनी फोन कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी पडळकरांनी विद्यार्थ्यांची मागणी फडणवीसांना सांगितली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, यासंदर्भातील दळवी समिती मागच्या सरकारच्या काळात झाली होती आणि त्यांनीच हा निर्णय़ घेतला होता. आता सगळ्यांनी ही मागणी केली असल्याने मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय आम्ही करू असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

Devendra Fadanvis on Pune MPSC student protest against new mpsc exam pattern
MPSC Protest : 'आम्ही घर कोंबडे नाहीत…'; पुण्यात विद्यार्थ्यी आंदोलनात भाजप आमदाराचं वक्तव्य

फडणवीस पुढे म्हणाले की, ही बैठक झाल्यानंतर यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री करतील. पण समजा सकारात्मक निर्णय केला तर आता २०२५ म्हणात आहात मग २०२७ म्हणाल असं करू नका. आपल्याला यूपीएसीच्या समकक्ष जाणं गरजेचं आहे असेही त्यांनी सांगितेले.

Devendra Fadanvis on Pune MPSC student protest against new mpsc exam pattern
Adani Group : भाजप नेत्याकडून अदानींची तुलना फ्रान्सच्या राजाशी; म्हणे "मी जगलो तरच…"

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्ष पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थी आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.