पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्यासंबंधी मुंबई पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस

पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यासंबंधी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस बजावली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on
Summary

पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यासंबंधी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस बजावली.

पुणे - पोलिसांच्या बदल्यांच्या (Police Transfer) घोटाळ्यासंबंधी (Scam) माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना मुंबई पोलिसांच्या (Police) सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस (Notice) बजावली. त्यानुसार, फडणवीस हे रविवारी बीकेसीच्या सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदविणार आहेत.

फडणवीस यांनी 23 मार्च 2021 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्‍त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधीची कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांकडे सादर केली होती. संबंधीत प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे आहे. याच प्रकरणामध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

या पार्श्‍वभुमीवर, फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी दंडसंहिता कलम 160 नुसार मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय टेलिग्राफ ऍक्‍ट कलम 43 ब, 66 माहिती तंत्रज्ञान अधिनीयम 2008 सुधारीत सहकलम 05, गोपनीयतेचा भंग (ऑफीशियल सिक्रेट ऍक्‍ट) 1923 असा उल्लेख आहे. सून संबंधित प्रकरणाचा तपास मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जात आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी फडणवीस यांचा जबाब घेण्यासाठी सायबर पोलिसांनी प्रारंभी प्रश्‍नावली पाठविली होती.

Devendra Fadnavis
मोदींनी भूमिपूजन केलेल्या 'या' योजनेला ठाकरे सरकारकडून 'ब्रेक'

परंतु, फडणवीस यांनी संबंधित प्रश्‍नावलीस उत्तर दिले नाही. त्यानुसार, पुन्हा 6 सप्टेंबर 2021 या दिवशी पोलिसांनी आणखी एक पत्र त्यांना पाठविले. त्यानंतर फडणवीस यांनी लवकरच माहिती पाठविणार असल्याचे पोलिसांना कळविले होते. परंतु पाच ते सहा वेळा पत्र पाठवूनही त्यांनी पोलिसांना उत्तर दिले नाही. त्यामुळे शुक्रवारी मुंबई सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी फडणवीस यांना जबाब नोंदविण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता बीकेसी पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. दरम्यान, फडणवीस यांनीही यासंबंधीची नोटीस आपल्याला प्राप्त झाली असून त्यानुसार, रविवारी आपण संबंधित पोलिस ठाण्यात जबाब देण्यासाठी जाणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.