Amit Shah In Pune: "पोर्टलचं उद्घाटन दिल्ली, गुजरातलाही करू शकले असते, पण..."; फडणवीसांनी सांगितलं पुणे निवडण्याचं कारण

Amit Shah Devendra Fadnavis
Amit Shah Devendra FadnavisSakal
Updated on

पुणे : सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमात अमित शाह पिंपरी चिंचवड येथे सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी या पोर्टलच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र निवडण्याचं कारण स्पष्ट केलं.

या कर्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शाह यांचं स्वागत केलं. यानंतर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची भूमी ही सहकाराची भूमी आहे. आपल्याला कल्पना आहे की, पद्मश्री विखे पाटील, वैकुंठभाई मेहता धनंजय गाडगीळ यांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. देशात सर्वाधिक सहकार ग्रामपातळीवर कुठे पोहचला असेल तर तो महाराष्ट्रत पोहचला आहे. सहारातून समृद्धी येऊ शकते अशी व्यवस्था राज्याने उभी केल्याने मोठं सहकार क्षेत्र राज्यात उभं झालं, असे फडणवीस म्हणाले.

Amit Shah Devendra Fadnavis
Amit Shah Pune Visit: 'राजकीय भेटी ते CRCS पोर्टलचे उद्घाटन', असं आहे अमित शहांच्या पुणे दौऱ्याचं वेळापत्रक

"हेच कारण आहे की अमित शाह यांनी सहकारिता मंत्रालय स्वीकारल्यानंतर नवीन कायदा करून देशात गावपातळीवर सहकार नेण्यासाठी व्यवस्था उभी केली. ती डिजीटल पोर्टलच्या माध्यमातून सर्वांना सुलभरित्या मिळाली पाहिजे यासाठी अधुनिक पोर्टल उभारलं. या पोर्टलच उद्घाटन दिल्ली किंवा गुजरातलाही करू शकले असते, पण खऱ्या अर्थानं सहकाराची पंढरी महाराष्ट्र आहे म्हणून अमित शाहांनी महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्हा निवडला" असे फडणवीस म्हणाले.

Amit Shah Devendra Fadnavis
Loksabha Election : लोकसभा जवळ येताच पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडून मोठा बदल; 'या' नेत्यांना दिली महत्वाची जबाबदारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर चारच दिवसांनी पुण्यात आले आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्या हस्ते केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या 'डिजिटल पोर्टल' सुरू केले जात आहे. या देशात 1,550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()