MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांना फडणवीसांकडून पुन्हा आश्वासन; म्हणाले, तर कोर्टात जावं लागेल...

devendra Fadnvis on MPSC Students Protest in pune assures students MPSC exam format syllabus
devendra Fadnvis on MPSC Students Protest in pune assures students MPSC exam format syllabus
Updated on

MPSC Students Protest in pune : पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पध्दतीत केलेले बदल २०२५ पासून लागू करावेत आणि याबद्दलचे नोटीफिकेशन लगेच जारी करण्यात यावे यासाठी आंदोलन करत आहेत. पुण्यात यासाठी कालपासून आंदोलन सुरू आहे.

जुन्या परीक्षा पध्दती प्रमाणेच आगामी एमपीएससीच्या परीक्षा घ्यावी, यासाठी हे विद्यार्थी आग्रही आहेत. दरम्यान यावेळी भाजपचे नेते अभिमन्यू पवार आंदोलनस्थळी पोहचले आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद करून दिला.

विद्यार्थ्यांशी फोनवरून बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आणि मुख्यमंत्र्यांनी आयोगाशी याबद्दल चर्चा केली. हे शक्य नाही, हे २०२५ पासूनच लागू केलं पाहिजे असे आयोगाला सांगितले आहे. तसेच पुन्हा आयोगाची बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय करा अन्यथा याविरोधात आम्हाला कायदेशीर बाजू घेऊन कोर्टात जावे लागेल असेही आयोगाला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

आयोगाला कुठल्याही पध्दतीने विद्यार्थ्यांचे म्हणणे पटवून देता येईल. जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तो पर्यंत आयोगाकडे नवीन जागा देखील पाठवत नसल्याचे देवेंद्र फडणीवस यावेळी म्हणाले. पहिलं हा निर्णय करावा असा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, सरकार शंभर टक्के आपल्या बाजूने आहे. आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आवश्यकता पडल्यास आम्ही कोर्टात जाऊ. पण हा निर्णय करून घेतला जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिलं. यांसबंधीचे वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

तर कोर्टात जावं लागेल..

नोटिफिकेशन आल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही अशी भूमीका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भावना योग्य आहेत, पण आयोग स्वयत्त आहे.

शासनाच्या हाती असतं तर शासनाने आजच नोटीफिकेशन काढलं असतं. पण आता पाठपूरावा करावा लागतो आहे. तरीही जर आयोगाने निर्णय कायम ठेवला तर शासनाला त्याविरोधात कोर्टात जावं लागेल. त्यामुळे या सगळ्याला वेळ लागू शकतो असे फडणवीस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()