धायरी - धायरी येथील डोंगरावरील शिवकालीन श्री खंडोबा देवस्थानच्या ऐतिहासिक खोबरषष्टी यात्रेत हजारो भाविकांनी गर्दी केली होती. श्री खंडोबाच्या जयघोषात पांरपारीक बगाड, भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली. मंदिरासह डोंगराचा परिसर भाविकांनी गजबजून गेला होता.
श्री खंडोबाचा पहाटे महाअभिषेक पुजेने यात्रेचा प्रारंभ झाला. वंशपरंपरागत मुख्य भगत राजाभाऊ कांबळे, मल्हार भक्त बजरंग पंडित यांच्या हस्ते पांरपारीक विधीवत पुजा करण्यात आली. मानाच्या देवकाठ्यांची ग्रामप्रदक्षिणा, पारंपरिक बगाड, महाआरती, तळीभंडार आदी ऐतिहासिक कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले होते.
स्थानिक भाविक सचिन राणोजी पोकळे व स्वाती पोकळे यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी खंडोबा देवस्थानचे सेवेकरी संदिप पोकळे, मोहन पोकळे, ऍड. उमेश पोकळे, चंद्रशेखर पोकळे, सिंहगड ट्रेकर्स ग्रुप, श्रीरंग चव्हाण, मिलिंद पोकळे, राहुल पोकळे, किशोर पोकळे, कैलास भोसले, किशोर रायकर, काका चव्हाण, राजाभाऊ लायगुडे, संतोष चकणकर, सचिन बेनकर, गंगाधर भडवळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे मंदिराचा परिसर अक्षरशः फुलुन गेला होता. श्री खंडोबाच्या खोबरषष्टी यात्रेला ऐतिहासिक परंपरा आहे. सिंहगडाच्या पूर्वेस सह्याद्रीच्या डोंगररांगांतील उंच डोंगरावर श्री खंडोबाचे शिवकाळापूर्वीचे मंदिर आहे. शिवकाळात १६६१ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवस्थानच्या पूजाअर्चेसाठी सण-उत्सावासाठी कायम इनाम जमीन दिली. त्यातील जमीन आता वनखात्याच्या ताब्यात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.