Student Agitation : शाळेला शिक्षक मिळावे म्हणून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

धायरी येथील महापालिकेच्या वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे शाळेत शिक्षकांअभावी इयत्ता आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.
Student Agitation
Student AgitationSakal
Updated on

पुणे - धायरी येथील महापालिकेच्या वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे शाळेत शिक्षकांअभावी इयत्ता आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. या शाळेला शिक्षक मिळावेत या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रसेवा समूहातर्फे शाळेत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शाळेसाठी शिक्षक नियुक्त केल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे.

महापालिकेची पोकळे शाळा एका खासगी संस्थेच्या माध्यमातून चालवली जात होती. पण या संस्थेकडून काम काढून घेण्यात आल्याने शाळेतील ४०० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. या शाळेसाठी पुरेसे शिक्षक द्यावेत अशी मागणी वारंवार करण्यात आलेली आहे. पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही. शिक्षक नसल्याने आठवीच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यास विलंब होत आहे.

Student Agitation
Pune Crime: पुण्याच्या शुक्रवार पेठेतील पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं; धक्कादायक कारण समोर

एकंदरीत शाळेची स्थिती चिंताजनक असल्याने त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रसेवा समूहाच्या कार्यकर्त्यांनी शाळेत अचानकपणे आंदोलन करत शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यास विद्यार्थ्यांचाही पाठिंबा मिळाला. राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, तुषार कुंभार, राहुल जाधव, रणजित जोरे, प्रसाद पोकळे, नवनाथ रायकर, स्मिता पोकळे, साई सांगळे, महेश पोकळे, निकेत पोकळे, ज्योती कुंभार, सुजाता डोळस, रूपाली रायकर, अतुल पोकळे, स्वप्नील पातुरकर, संकेत जोरे, सागर जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

शिक्षण प्रमुख मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘पोकळे शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन झाले आहे. या शाळेत करार पद्धतीवरील सहा शिक्षकांची आज नियुक्ती केली आहे. तसेच कायम सेवेतील तीन शिक्षकांची येथे नियुक्ती केलेली आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()