BJP Pune : अखेर पुण्यात खांदेपालट! भाजपच्या शहराध्यक्षपदी 'या' नेत्याची वर्णी

pune bjp
pune bjp
Updated on

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे पुणे शहराध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आज सकाळी प्रदेश कार्यालयाकडून शहराध्यक्ष पदी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

माजी आमदार जगदीश मुळीक यांची शहराध्यक्षपदाची मुदत उलटून जवळपास एक वर्ष होऊन गेलेला आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण याची चर्चा शहरात गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. यामध्ये स्वतः जगदीश मुळीक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह इतर काही जण इच्छुक होते.

pune bjp
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षातही 'एनडीए' विरूद्ध 'इंडिया'; प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही…

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये धीरज घाटे हे देखील इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केलेला होता. मात्र पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार करण्यात आलेला नव्हता. त्यांना पक्षाच्या नेत्यांकडून शहराध्यक्ष पदाचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येत होते. कसब्याच्या निवडणूकीनंतर संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जातील अशी संकेत पक्षाचे नेतृत्वाने दिलेले होते. पण राज्यात घडत असलेल्या अनपेक्षित घडामोडींमुळे भाजपकडून शहराध्यक्ष पदाची घोषणा केली जात नव्हती.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० जून या दिवशी महाराष्ट्रातील सर्व नवे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष जाहीर केले जातील असे सांगितले होते. मात्र ही मुदत देखील उलटून गेली. अखेर आज सकाळी प्रदेश कार्यालयाकडून राज्यातील नवे जिल्हाध्यक्ष आणि शहर देशांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये पुणे शहराची जबाबदारी घाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून धीरज घाटे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत होते आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून ही देखील घाटे यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आज घाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

pune bjp
Kirit Somaiya : 'मला पेनड्राइव्ह दिलाय, आता तो बघणं म्हणजे…'; नीलम गोऱ्हेंनी सभागृहात मांडला महत्वाचा मुद्दा

धीरज घाटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून त्यांनी प्रचारक म्हणून देखील काम केलेले आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांच्यावर सभागृहनिधी पदाची देखील जबाबदारी देण्यात आलेली होती. घाटे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील आमदार होण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना संधी देण्यात आली नवंहती. अखेर भाजपकडून त्यांना आता पुणे शहराचे महत्त्वाचे जबाबदारी देण्यात आलेली आहे.

"पक्षाकडून मला शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली याचा आनंद आहे. आगामी महापालिका निवडणुकी पुन्हा एकदा सत्ता मिळवून देऊ, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकू. यासाठी सर्वांच्या समन्वयातून उत्तम पक्ष संघटन तयार केले जाईल. मला ही संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो."

- धीरज घाटे, शहराध्यक्ष, पुणे भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.