अजित पवारांनी पोलिस आयुक्तांना फोन केला होता का ः अंजली दमानिया
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २७ ः पुण्यातील अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला होता का? असा थेट सवाल आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमावरून विचारला आहे. अजित पवार आज पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते? जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत? असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले. या प्रकरणी आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या प्रकरणी काही पत्रकारांच्या पोस्ट मी पाहिल्या, वाचल्या. अजित पवारांनी पुण्यातल्या पोलिस आयुक्तांना फोन केल्याचे काही जण म्हणत आहेत. हीच शंका माझ्याही मनात होती. कारण सुरुवातीचे चार दिवस अजित पवार काहीच बोलले नाहीत. मी रोज सकाळी उठून काम करतो वगैरे म्हणणारे अजित पवार अपघाताबाबत गप्प होते. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. ही सगळी सारवासारव कुणासाठी चालली होती? असेही त्या म्हणाल्या. तसेच काही सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.
दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न
१. पालकमंत्री म्हणून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही ठिय्या देऊन सीपी ऑफिसमध्ये का बसला नाहीत?
२. ज्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूला का बसले नव्हता?
३. या प्रकरणी प्रतिक्रिया द्यायला तुम्हाला चार दिवस का लागले?
४. घटना घडली तेव्हा तुम्ही नेमके कुठे होतात?
५. तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का ?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.