पुणे - मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात तांत्रिक अटक (डिजिटल अरेस्ट) करून सायबर चोरट्यांनी एका आयटी अभियंत्याची सहा कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना या अभियंत्याच्या पैशांवर सायबर चोरट्यांनी क्षणार्धात डल्ला मारला.